`झी २४ तास`चा दणका : वाघाचं अवैध चित्रीकरण करणारा निलंबित
भंडाऱ्यातील उमरेड करांडला अभयारण्य प्रकरणात वन विभागाच्या गाडीवर बसून वाघाचे चित्रीकरण करणाऱ्या वनविभागाच्या हंगामी मजूराला निलंबित करण्यात आलंय.
भंडारा : भंडाऱ्यातील उमरेड करांडला अभयारण्य प्रकरणात वन विभागाच्या गाडीवर बसून वाघाचे चित्रीकरण करणाऱ्या वनविभागाच्या हंगामी मजूराला निलंबित करण्यात आलंय.
वैयक्तिक कारणामुळे मुद्दा चर्चेला आल्यामुळे अभयारण्याची प्रतिमा मलीन होत असल्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी कारवाई केलीय... तर प्रकरणाची अधिक चौकशी संबंधित अधिकाऱ्यांकडून सुरु आहे.
दरम्यान, पवनी येथील उमरेड करांडला अभ्ययारण्यात वन विभाग तर्फेच नियमांची पायमल्ली केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या वनमजुरानं शासकीय वाहनाचा वापर करुन जय वाघाच्या बछड्याचं चित्रीकण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
विपिन टलमले असं याचं नाव आहे. संध्याकाळच्या सुमारास अशा प्रकारे वाघाचं चित्रीकरण करता येत नाही. मात्र, शासकीय वाहनाचा वापर करुन वनमजुरानंच हा प्रकार केल्यानं वन्यजीव प्रेमींमध्ये संतापाचं वातावरण आहे.
याआधीसुद्धा अशा प्रकारे नियम तोडल्यामुळे वन विभागाने त्याला २५०० रुपयांचा दंड करण्यात आला होता.