माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा  : जोडीदाराचा शोध घेत भंडाऱ्याच्या उमरेड करांडला अभयारण्यात पोहोचलेली ही वाघीण. त्याच्यासाठी तिनं नद्या, नाले, ओढे, डोंगर, दऱ्याखोऱ्या सारं काही पार केलं,आणि त्याच्या शोधात ती इथं पोहोचली आहे.


राजबिंडा जयचा बछडा जयचंद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तो दिसायला राजबिंडा, तमाम पर्यटकांचं आकर्षण असलेल्या जयचा बछडा जयचंद. दिसायला अगदी उमदा.... जयसारखाच धडधाकट.


जयचंद दोन वाघिणींबरोबर


सध्या जयचंद दोन वाघिणींबरोबर राहतो. त्याचं कुटुंबही वाढलं आहे, पण आणखी एक वाघीण जयचंदकडे आकर्षित झाली, त्याचा शोध घेत उमरेड क-हाडला अभयारण्यात पोहोचली. त्याच्यासाठी तिनं तब्बल 110 किलोमीटरचा प्रवास केला.


कदाचित ती जयचंदच्या प्रेमात


ही राहायची चंद्र्पुरातल्या ताडोबा प्रकल्पात. तिथंच तिनं जयचंदला पाहिलं. तिथेच कदाचित ती जयचंदच्या प्रेमात पडली. जयचंद उमरेड क-हाडलाला स्थलांतरीत झाल्यावर तीही त्याचा माग काढत आली.


शोधात प्रवास किंवा सीमोल्लंघन


वाघ वाघिणीच्या शोधात प्रवास किंवा सीमोल्लंघन करतो. पण वाघिणीनं वाघासाठी एवढा प्रवास करणं हे निश्चितच आश्चर्यकारक. 


अभयारण्यात सध्याच्या घडीला पाच वाघ


उमरेड पवनी करांडला अभयारण्यात सध्याच्या घडीला पाच वाघ आहेत. आता या नव्या वाघिणीला जयचंदसारखा जोडीदार मिळाला तर या वाघांची संख्या आणखी वाढणार आहे.


फक्त जयच्या दोन वाघिणी या नव्या सवतीला कसं सामावून घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.