पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार महत्वाचा निर्णय
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणाचा अहवाल मागवला
मुंबई : टीकटॉक स्टार पूजा चव्हाण प्रकरणी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणाचा अहवाल मागवला आहे. या प्रकरणी ऑडीया क्लीप समोर आली असून यामध्ये शिवसेनेच्या मंत्र्याचा सहभाग असल्याची टीका विरोधकांकडून होतेय. पुजाच्या आत्महत्येनंतर वायरल होणाऱ्या ११ ऑडीओ क्लीपमध्ये संजय राठो़ड यांचा आवाज असल्याचा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलाय. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या डिजीपींना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे.
टीकटॉक स्टार पूजा चव्हाण हिने इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरुन उडी मारत आत्मह्या केली. ती पुण्यात आपल्या भावासोबत राहून शिक्षण घेत होती. तिच्या आत्महत्येनंतर घटनेशी संबंधित ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाल्या. प्रेम संबधातून पूजाने आत्महत्या केल्याचा आरोप केला जातोय.
याप्रकरणी कोणतीही सुसाईड नोट पोलिसांना सापडली नाहीय. पण सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या क्लीपची चौकशी झाली पाहीजे अशी मागणी भाजपने केलीय.