विष्णु बुरगे, झी मीडिया, बीड : शिवशाही एसटी बसचा टायर फुटला (Tire burst) आणि प्रवाशांचा जीव धोक्यात आला. मात्र, ड्रायव्हरने जीवाची बाजी लावून 30 प्रवाशांचा जीव वाचवला आहे. ड्रायव्हर प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे. अपघात घडूनही सर्व प्रवासी सुखरुप बचावले आहे. बीडमधील माजलगाव तालुक्यातील तेलगाव येथे ही अपघाताची घटना घडली आहे (accident of Shivshahi bus in Beed). ड्रायव्हरच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीडच्या माजलगाव तालुक्यातील तेलगाव कारखाना परिसरात शिवशाही एसटी बसचे टायर अचानक फुटल्याने मोठा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात जिवीत हानी टळली. काही प्रवासी या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत.


बीडच्या धारूर येथून औरंगाबादला जाणारी शिवशाही बस अपघात ग्रस्त झाली आहे. ही बस धारूर वरून औरंगाबादकडे निघाली असताना एका चौकातच या धावत्या बसचा टायर अचानक फुटला. यामुळे बसचा ड्रायव्हर गोंधळा. मात्र, त्याने सतर्कता दखवत बसवर नियंत्रण मिळवले आणि बस रसत्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकावर धडकवली. दुभाजकावर धडकल्यामुळे बसचा स्पीड कमी झाला आणि बस मध्येच थांबली.  ड्रायव्हरने बस दुभाजकावर नेल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. टायर फुटलेली बस इतरत्र धडकली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. 


बसमधील 30 प्रवाशी सुखरूप आहेत. पाच ते सहा प्रवाशी किरकोळ जखमी झाली आहेत. चालकाने प्रसंगावधान साधल्याने मोठा अनर्थ टळला आहे.  बस रस्त्यांच्या मधोमध थांबल्याने काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. मात्र, अपघाताचे वृत्त समजताच पोलिस आणि एसटीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बसमधील सर्व प्रवाशांची दुसऱ्या बसमध्ये व्यवस्था करण्यात आली.  यानंतर ही बस दुरुस्तीसाठी कार्यशाळेत नेण्यात आली. 


एसटी महामंडळाच्या बसेस वारंवार अपघातग्रस्त होतात


एसटी महामंडळाच्या बसेस अर्थात लाल परी ग्रामीण भागातील जनतेचा मोठा आधार आहे. ग्रामीण भागातील 90 टक्के लोक प्रवासासाठी या लाल परीवर अवलंबून आहेत. मात्र, एसटी महामंडळाच्या बसेस वारंवार अपघातग्रस्त होत आहेत. नादुरुस्त गाड्या वापरून परिवहन मंडळ प्रवाशंच्या जीवाशी खेळत आहे का? असाही प्रश्न सध्या समोर येत आहे. लालपरी बससह शिवशाही देखील नादुरुस्त अवस्थेत पाहायला मिळत आहे. यामुळे डेपोतून निघताना या बसेसची तपासणी केली जात नाही का? असा प्रश्न देखील प्रवाशांनी उपस्थित केला आहे.