मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील तिवरे धरण फुटल्यानंतर मोठी जीवित आणि वित्तहानी झाली. २३ जण वाहून गेलेत. तर अनेकांची घरे आणि जनावरे वाहून गेलीत. शेतजमीन नापीक झाली. त्यामुळे तिवरे परिसरातील अनेक वाड्या आणि गावांचा या धरण फुटीचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे त्यांना मदतीची गरज आहे. त्यांचे जीवन पूर्वपदावर येण्यासाठी खूप कालावधी जाणार आहे. त्यामुळे त्यांना जास्तीची आणि तातडीची मदत करणे गरजेचे आहे. येथे पाऊस पडूनही पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या येथे टॅंकरेन पाणीपुरवठा होत आहे. अनेकांना घरे नसल्याने त्यांच्या राहण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. अनेकांचे शिक्षण खोळंबले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी तातडीने लक्ष देऊन येथील ज्या काही समस्या आहेत, त्या सोडवाव्यात, अशी मागणी पत्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


८ जुलै रोजी तिवरे धरण दुर्घटनेचा प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पवार यांनी आढावा घेतला होता. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहून वस्तुस्थिती स्पष्ट करुन दिली आहे. राज्य सरकारने धरणग्रस्तांना दिलेली ४ लाख रुपयांची मदतही तुटपुंजी आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील माळीण गावाप्रमाणे इथल्या लोकांचे पुनर्वसन करावे, असे पवार म्हणालेत.