ठाण्याच्या महापौरांचा अमृता फडणवीसांना जोरदार धक्का
अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारभारावर टीका केली होती
कपिल राऊत, झी २४ तास, ठाणे : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेना यांच्यातील वादात ऍक्सिस बँकेला मोठा दणका बसलाय. ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची ऍक्सिस बँकेतील खाती इतर सरकारी बँकांमध्ये वळवण्याचे आदेश ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी दिलेत.
अधिक वाचा - माजी मिसेस मुख्यमंत्र्यांना धक्का देण्याची ठाकरे सरकारची तयारी
अधिक वाचा - मिसेस फडणवीसांचा शिवसेनेवर पलटवार; म्हणाल्या...
अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारभारावर टीका केली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील पोलीस कर्मचाऱ्यांची ऍक्सिस बँकेतली खाती इतर बँकांमध्ये वळवण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झालीय. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनं हा निर्णय घेतलाय.
अमृता फडणवीस यांनी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टीकेचं लक्ष्य केलंय. त्यानंतर, महिला शिवसैनिकांकडून अमृता फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. इतकंच नाही तर त्यांच्या पोस्टरला जोडे मारण्याचं आंदोलनही या महिलांनी घडवून आणलं.
अमृता फडणवीस यांना धक्का देतानाच देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय बदलून पोलीस कर्मचाऱ्यांची ऍक्सिस बँकेतील खाती राष्ट्रीयकृत बँकेत वळवण्याचा निर्णय ठाकरे सरकारकडून लवकरच घेतला जाण्याची शक्यता 'सामना'तू वर्तवण्यात आलीय.