Petrol Diesel Price Today : देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर अपडेट  केले जातात. जून 2017 पूर्वी दर 15 दिवशांनी किमतीत सुधारणा केली जात होती. त्यानंतर पेट्रोलच्या किंमतीत अद्याप सुधारणा करण्यात आली नाही. पेट्रोलच्या किमती अजूनही शंभरी पार आहेत. लोकसभा निवडणूकीपूर्वी तरी पेट्रोल डिझेलचे दर कमी होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज (6 फेब्रुवारी) जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली असून कच्च्या तेलाच्या दरानुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवले जातात. अलीकडेच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण दिसून आली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान आज (6 फेब्रुवारी) ब्रेंट क्रूड $80 च्या आसपास व्यवहार करत आहे. भारतीय पेट्रोलियम कच्च्या तेलाचे दर प्रचंड घसरत पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाच्या दरात घसरण होत असून भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे नवीन दर जाहीर केले आहेत. जागतिक बाजारपेठेत पुन्हा एकदा तेजी आली आहे. ब्रेंट क्रूडची किंमत सुमारे $0.40 ते $77.99 प्रति बॅरल वाढली. डब्ल्यूटीआय तेलाचा दर देखील आज प्रति बॅरल $72.73 वर आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वेबसाइटनुसार, नेहमीप्रमाणे आज इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थे पाहायला मिळत आहे. 


महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे दर


महाराष्ट्रात आज पेट्रोल 106.62 रुपये आणि डिझेल 93.13 रुपये प्रतिलिटर 


मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर


पुण्यात पेट्रोल 106.01 रुपये आणि डिझेल 92.53 रुपये प्रति लिटर


ठाण्यात पेट्रोल 106.49 रुपये आणि डिझेल 94.45 रुपये प्रति लिटर


नाशिकमध्ये  पेट्रोल 105.97 रुपये आणि डिझेल 92.47 रुपये प्रति लिटर


नागपूरमध्ये पेट्रोल 106.19 रुपये आणि डिझेल 92.74 रुपये प्रति लिटर


कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.47 रुपये आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर 


महाराष्ट्रात गेल्या 10 दिवसांतील पेट्रोलचे दर


महाराष्ट्रात आज पेट्रोलची सरासरी किंमत 106.62 रुपये प्रति लिटर आहे. गेल्या महिन्याच्या शेवटच्या तारखेला महाराष्ट्रात पेट्रोलची सरासरी किंमत 107.08 रुपये प्रतिलिटर होती, त्या तुलनेत आता0.17 टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या 10 दिवसांत महाराष्ट्रात पेट्रोलचा सरासरी दर 106.91 रुपये प्रतिलिटर झाला आहे. 


घरबसल्या चेक करा पेट्रोल-डिझेलचे दर 


पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्ही घरबसल्या जाणून घेऊ शकता. घरबसल्या तुम्हाला तुमच्या फोनवर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींची माहिती मिळेल. इंडियन ऑइलच्या ग्राहकांसाठी, RSP आणि तुमचा शहर कोड लिहा आणि 9224992249 वर पाठवा. BPCL ग्राहकांसाठी RSP आणि शहर कोड लिहा आणि 9223112222 वर पाठवा.