चंद्रपूर : जिल्ह्यातील चिमूर इथं तहसीलदार म्हणून रुजू झालेले तहसीलदार संजय नागटिळक चर्चेत आलेत ते त्यांनी आपल्या टेबलावर लावलेल्या पाटीमुळे. ''शौचालय असेल तरच बोला'', या त्यांच्या पाटीनं जिल्ह्यात धम्माल उडवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका दहा बाय  दहाच्या कार्यालयात असलेली ही पाटी आता सर्व जिल्ह्यात प्रसिद्ध झाली आहे. हेतू  एवढाच की, लोकांमध्ये शौचालयाप्रती जागृती निर्माण करणे. एरव्ही लाखोंच्या जाहिराती करूनही जे साध्य होत नाही, ती किमया एका छोट्याशा पाटीनं साधली. 


कल्पकता आणि आत्मीयता, या दोन्ही बाबींचा सुरेख मेळ तहसीलदारांनी यात घातलाय. त्यांच्या भेटीसाठी शहरी आणि ग्रामीण भागातून जे लोक येतात, ते सर्वप्रथम ही पाटी वाचतात आणि बाहेर येऊन चर्चा करतात. एक विधायक चर्चा घडवण्यासाठी ही पाटी किती उपयुक्त ठरली, हे त्यांच्या चर्चेवरून दिसून येते.