नवी मुंबई : वाशीत एका तरुणावर चार ते पाच जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. पीडित तरुण सोमवारी संध्याकाळी वाशीतल्या जागृतेश्वर मंदिराजवळ फिरण्यासाठी गेला होता. त्यावेळी चार ते पाच जणांच्या टोळक्याने त्याचं अपहरण केले. त्यानंतर लैंगिक अत्याचार केला. सुरुवातीला तरुण बेशुद्ध पडला होता. शुद्धीवर आल्यानंतर तो रुग्णालयात दाखल झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, नवी मुंबईतल्या बेलापूर शहाबाज परिसरातील दोघांना जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. ही मारहाण पूर्ववैमनस्यातून करण्यात आल्याचं समोर आले आहे. हल्ला करण्यात आलेले दोन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहे. याप्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. 


पनवेलमध्ये एकावर चाकू हल्ला करण्यात आलाय. कामाच्या वेळेत बदल केल्याच्या रागातून चार सफाई कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सुपरवायझरवर चाकू हल्ला केलाय. याप्रकरणी जखमी सुपर वायझवर उपचार सुरू असून, हल्लेखोरांविरोधत गुन्हा दाखल करण्यात आलाय.