लोणावळा : पाण्याचा प्रवाह वाढल्याने लोणावळ्यातील भुशी धरण पाय-यांवर जाण्यावर पर्यटकांना बंदी घालण्यात आलीये. सुरक्षेचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोणावळा शहरात मागील 40 तासात सुमारे 325 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आलीय. त्यामुळे पावसाळी पर्यटनासाठी लोणावळ्यात येणा-या पर्यटकांची संख्या वाढलीय. मात्र त्याच बरोबर या मुसळधार पावसामुळे पर्यटकांचे सर्वाधिक आकर्षण असणा-या भुशी धरणाच्या सांडव्यावरून ओव्हरफ्लो होऊन वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाहाचा वेग वाढलाय. 


त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव धरणाच्या सांडव्या पुढील पाय-यांवर बसून मौजमस्ती करायला आलेल्या पर्यटकांना बंदी घालण्यात आल्याने नाराजी पसरलीय. तरीही अनेक उत्साही पर्यटक धरणाच्या पुढील बाजूला वाहणा-या पाण्यात डुंबण्याचा आनंद घेत पावसाळी पर्यटनाची मजा घेताना दिसून येतायत.