नागपूरच्या उमरेड क-हांडला अभयारण्यात वाघीण आणि तिच्या पाच बछड्यांची अडवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. एफ 2 वाघीण तीच्या 5 बछड्यांसह जात असताना सफारीवर आलेल्या गाईड्स आणि जिप्सी चालकांनी त्यांना सर्व बाजूंनी घेरलं. याप्रकरणी सफारीच्या नियमांचं उल्लंघन केल्याने वाघीणीला घेरणा-या 4 जिप्सी चालक आणि 4 गाईड्सला 7 दिवसासाठी निलंबित करण्यात आलंय. वन्यप्रेमींनी मात्र मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूरच्या उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात एफ-2 वाघीण आणि तिचे पाच बछडे पाहा. अभयारण्य हे एफ-2 वाघिणीचं घर आहे. पण तिच्या हक्काच्या घरातच तिला फिरण्याची चोरी झालीय. अभयारण्यातील गोठणगावच्या जंगलात सफारीवाल्या जिप्सींनी एफ-2 वाघिणीचा रस्ता अडवला होता. दोन्ही बाजूनं पर्यटकांची जिप्सी आणि मध्ये वाघीण आणि तिचे बछडे अशी परिस्थिती होती. हमखास साईटसिईंगच्या आश्वासनाच्या नावाखाली वाघीणीचा छळ मांडलाय का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय. एफ-2 वाघीणीच्या अडवणुकीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर वाघीणीला घेरणा-या 4 जिप्सी चालक आणि 4 गाईड्सला 7 दिवसासाठी निलंबित करण्यात आलंय. तर जिप्सी चालकांवर अडीच हजार आणि गाईडला 450 रुपये प्रति व्यक्ती दंड लावण्यात आला आहे.


वाघिणीच्या अडवणुकीवर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्यात. अडाणी पर्यटक आणि सफारीवाल्यांना वाघीणीनंच शिक्षा द्यायला हवी अशी भूमिका विजय वडेट्टीवारांनी मांडलीये. वाघीणीचा रस्ता अडवताना सफारीवाल्यांनी पर्यटकांच्या सुरक्षेचा विचार केला नाही का असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलाय.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by ZEE 24 TAAS (@zee24taas)


तर एफ-2 वाघीण हिचीही स्टोरी इंटरेस्टिंग आहे.


F-2 वाघिणीचा N-4, पाटील आणि J-मार्क वाघांसोबत वावर आहे


F-2 वाघीण फेरी वाघिणीची दुसरी मुलगी आहे.


फेरी वाघीण चांदी वाघिणीची मुलगी आहे


नागझिरा अभयारण्यातून आलेल्या सेहतराम वाघाची ती मुलगी आहे.


वाघ दाखवण्याचं आमिष दाखवून सफारीवाले पर्यटकांचा जीव धोक्यात घातलायत. तर काही प्रसंगात पर्यटकांच्या आग्रहालाही सफारीचालक बळी पडतात. त्यामुळं सफारीसाठी योग्य नियमावली बनवण्याची गरज निर्माण झालीये.