ट्रक बंद पडल्याने मुंबई-रायगड महामार्गावर कोंडी
मुंबई-रायगड महामार्गावर पेणन जवळ ट्रक बंद पडल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. त्यामुळं या महामार्गावर 2 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पहाटे साडेपाचच्या सुमारास महाड जवळच्या केंबुर्ली गावालगत महामार्गावर दरड कोसळल्यामुळं मातीचा ढिगारा रस्त्यावर आला. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती.
पेणन : मुंबई-रायगड महामार्गावर पेणन जवळ ट्रक बंद पडल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. त्यामुळं या महामार्गावर 2 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पहाटे साडेपाचच्या सुमारास महाड जवळच्या केंबुर्ली गावालगत महामार्गावर दरड कोसळल्यामुळं मातीचा ढिगारा रस्त्यावर आला. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती.
मुंबई-गोवा महार्मागाच्या चौपदरीकरणाचं काम सुरू असल्यानं या भागात आधीच वाहतूक धिम्या गतीनं होते. त्यातच मुसळधार पावसानं मातीचा ढिग रस्त्यावर आला आहे. हा ढिगारा बाजूला करण्याचं काम सुरू झालं असतानाच ट्रक बंद पडल्यामुळं पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झाली आहे.