मुंबई - गोवा महामार्गावर कंटेनर-टेम्पो अपघातानंतर वाहतूक कोंडी
मुंबई - गोवा महामार्गावर अपघातानंतर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
रायगड : मुंबई - गोवा महामार्गावर महाडच्या वीर येथे पहाटेच्या सुमारास कंटेनर आणि टेम्पो यांच्यात समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे. अपघातग्रस्त टेम्पो बाजूला करण्यात आला असला तरी कंटेनर बाजूला करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या अपघातानंतर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे अनेकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांची कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून दासगाव ते लोणेरे दरम्यान एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यातच रस्त्यावर खड्डे पडल्याने आधिक उशिर होत असताना या अपघातामुळे मोठी कोंडी झाली आहे. त्यातच रात्रापासून पाऊस पडत आहे. तसेच खड्डे यामुळे वाहन चालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.