Narendra Modi in Pune: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उद्या म्हणजेच 1 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदींचा लोकमान्य टिळक पुरस्काराने (Lokmanya tilak award 2023) सन्मान केला जाणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित असणार आहेत. तसंच शरद पवार प्रमुख पाहुणे असणार आहेत. याशिवाय नरेंद्र मोदींच्या हस्ते विविध विकासकामांचंही उद्घाटन होणार आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे पुणेकरांनी या मार्गाने प्रवास करणं टाळा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे शहरातील विविध विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम 1 ऑगस्टला शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आयोजित करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने आवश्यक ते वाहतूक बदल करण्यात येणार आहेत अशी माहिती पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली आहे. 


PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यातून पुणेकरांना काय मिळणार? वाचा तुमच्या फायद्याची गोष्ट!


 


1 ऑगस्ट रोजी सकाळी 6 ते दुपारी ३ वाजेपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात आवश्यकतेप्रमाणे पुणे विद्यापीठ चौक, सिमला ऑफिस चौक, संचेती चौक, स. गो. बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक, सेवासदन चौक, अलका चौक, टिळक रोड, जेधे चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड, संगमवाडी रोड, सादलबाबा चौक, गोल्फ क्लब चौक, विमानतळ रोड आदी ठिकाणांवरील वाहतूकीत बदल करण्यात येणार आहे.


दरम्यान, पुणे पोलिसांनी ट्वीट करत वाहतूक पूर्णपणे 9 तास थांबवली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. सोशल मीडियावर काहीजण विनाकारण संभ्रम निर्माण करत असून त्याकडे दुर्लक्ष करा असं आवाहन पुणे पोलिसांनी केलं आहे. पोलिसांनी सांगितलं आहे की, ताफा ज्या मार्गाने जाईल तेथील वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव आवश्यकतेप्रमाणे टप्याटप्याने बंद ठेवण्यात येणार आहे. यातील काही रस्ते सलगप्रमाणे मोठ्या कालावधीसाठी बंद नसतील. इतर वेळी वाहतूक पूर्ववत असणार आहे. 


तसंच पुणे शहरातील शाळा, महाविद्यालयं, सर्व आस्थापना, दुकानं, कार्यालयं, शासकीय कार्यालयं, कंपन्या यांचे काम सुरळीत सुरु राहणार आहे. 



वाहनचालकांनी त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी या मार्गांचा वापर टाळून अन्य पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आलं आहे.


मोदींचा दौरा कसा असेल - 


नरेंद्र मोदी यांचा लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुण्यातील मेट्रोसह विविध प्रकल्पांच मोदी उद्घाटन करणार आहेत. 


– 10.30 वाजता पंतप्रधान मोदींच पुणे विमानतळावर आगमन होईल
– सकाळी 11 वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन आणि पूजा 
– 11.45 वाजता लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येईल
– दुपारी 12:45 वाजता मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा 
- मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून पुणे मेट्रो टप्पा 1 च्या कार्य पूर्ण झालेल्या दोन मार्गिकांच्या सेवेचे लोकार्पण 
– शिवाजीनगरच्या ग्राऊंडवर सभा 
– तसंच विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार