कल्याण : अखेर कल्याणचा १०४ वर्षे जुना पत्रीपूल इतिहासजमा झाला. मध्य रेल्वेने महामेगा ब्लॉक घेऊन या पुलाचं पाडकाम पूर्ण केलं. कल्याण डोंबिवली यांना जोडणाऱ्या या पुलाचे दोन्ही गर्डर आज सकाळी काढण्यात आले. हे काम मध्य रेल्वेने वेळेआधीच पूर्ण केल्याने या कामाचं कौतुक होत आहे.


पत्री पूल

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुपारी सव्वा ते दीड वाजण्याच्या दरम्यान गर्डर काढण्याचं काम पूर्ण झालं. त्यानंतर तातडीने ओव्हरहेड वायरची जोडणी पूर्ण करून मध्य रेल्वेने अडीचच्या सुमारास पहिली मेल एक्स्प्रेस गाडी कल्याणकडून मुंबईच्या दिशेला रवाना केली.


त्यानंतर दोन पन्नासच्या सुमाराला पहिली लोकल रवाना झाली. पत्रीपूल पाडण्याचं काम विक्रमी वेळेत पूर्ण झालं. वेळेआधी ४५ मिनिटे काम पूर्ण झालंय.