हडपसर : भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केल्यानं कोंढव्याचे पोलीस निरिक्षक मिलिंद गायकवाड यांची बदली केल्याचा आरोप होतोय.  या बदलीविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आंदोलन केलं. पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलनाला परवानगी नाकारल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. गायकवाड यांच्या बदलीचा निषेध केला.


आमदाराविरोधात घोषणाबाजी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमदार योगेश टिळेकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. राजकीय पक्षांबरोबरच सामाजिक संस्था आणि संघटनाही गायकवाड यांच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत.


भाजपा आमदार योगेश टिळेकर यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.


ऑप्टीकल फायबर केबल टाकणाऱ्या कंपनीकडे खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय.


टिळेकर यांच्यासह त्यांचा भाऊ चेतन आणि गणेश कामठे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलाय. टिळेकर भाजपचे हडपसर मतदार संघातील आमदार आहेत.


गुन्हा दाखल 


सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. कार्यकरत्या गणेश कामटे आणि दोन्ही भावांनी 50 लाखांची खंडणी मागितल्याचं म्हटलंय.


एक महिन्यापूर्वी यासंदर्भात फोनवर संभाषण झाल होतं. फिर्यादींनी ही ऑडिओ क्लिपही पोलिसांना दिली आहे.