Pune Accident Video 2022: आता बातमी आहे भयानक अपघाताची (ACCIDENT)...महामार्गावरील अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. पुण्यात (Pune) कंटेनर (Container) आणि कारचा (Car) भीषण अपघात (Terrible Accident) झालाय. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कैद झाला आहे. अपघाताचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो. सुदैवाने या अपघातात कोणाचा मृत्यू झालेला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये पाहू शकता कंटनेर चालक किती क्रुरपणे या कारला फरफटत नेतं आहे. भरधाव कंटेनरनं कारला जवळपास 2 किलोमीटर अंतरापर्यंत फरफटत नेल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतं आहे. (Treading PUNE SHIRUR ACCIDENT CCTV 2022 Shocking Video)


धक्कादायक म्हणजे कंटनेर चालक मद्यधुंद अवस्थेत होतो, जेव्हा हा अपघात झाला. या कंटनेर चालकाने  कारला मलठण फाट्यापासून कासारी फाट्यापर्यंत फरफटत नेलंय. शिक्रापूर तालुक्यातील पुणे-नगर महामार्गावर ही घटना घडलीय. या कारमध्ये चार प्रवासी होते.  



त्यात दीड वर्षाच्या चिमुकल्याचाही समावेश होता. हे सर्व प्रवाशी थोडक्यात बचावलेत. असं म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी या मराठी म्हणीचा प्रत्यय हा दुर्घटनेनंतर येतो. 


पाहा धक्कादायक व्हिडीओ -