मुंबई : बदलापूर येथील चंदेरी किल्ल्याजवळच्या सुळक्यावर अडकलेल्या गिर्यारोहकाला त्या ठिकाणहून सोडवण्यासाठी पुन्हा एकदा बचावकार्याला वेग आला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

म्हैसमाळ येथे तो गिर्हारोहक अडकला होता. पण, रात्री उजेडाअभावी त्याची सुटका करता येणं शक्त झालं नाही. विषारी साप आणि अंधारामुळे बचावकार्यात अडचणी येत असल्याचं पाहायला मिळालं.


उदय रेड्डी असं त्या व्यक्तीचं नाव असून, ते सिव्हासा येथून बदलापूर येथील चंदेरी किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेले होते.


रविवारी सकाळच्या वेळेस त्यांनी एकट्याने किल्ला चढण्यास सुरुवात केली. पण त्यादरम्यानच ते रस्ता चुकले आणि दुसरा सुळका चढले. 


काही काळानंतर आपण भरकटल्याचं लक्षात येताच त्यांनी आपल्या मित्रांशी मोबाईलद्वारे संपर्क साधला. 


ज्यानंतर त्यांनी कुळगाव पोलीस स्थानक आणि काही ट्रेकर्स ग्रुपना याविषयीची माहिती दिली. पोलीस आणि संबंधित ग्रुपना याविषयीची माहिती मिळताच रेड्डी यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरु करण्यात आले. 


रेड्डी यांच्याशी पुढे संपर्क झाला असून ते सुखरुप असल्याचं कळत आहे. काही तासांमध्येच हे बचावकार्य पूर्ण होण्याची चिन्हं असून, त्यांना खाली उतरवण्यात येणार असल्याचं कळत आहे.