मुंबई : Pune Housing Society Notice: पुण्यातील पाट्यांचे किस्से अनेकांना माहीत आहेत. आता अशीच एक पाटी लिफ्टसमोर लावण्यात आली आहे. या पाटीची जोरदार चर्चा सोशल मीडियावर होत आहे.  वाढत्या लोकसंख्येमध्ये कमी होत असलेल्या जमिनीमुळे, उंच उंच टॉवर्सचा ट्रेंड जगभरात खूप लोकप्रिय होत आहे. महानगरातील आव्हाने असताना या बहुमजली इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी लिफ्ट ही सर्वात महत्त्वाची सुविधा मानली जात होती. आता या लिफ्टबाबत पुण्यातील एका गृहनिर्माण संस्थेची नोटीसने इंटरनेटचा पारा चढला आहे.


समाजात फूट पाडल्याचा आरोप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घरकामगारांसाठी म्हणजेच सोसायटी हेल्पर्ससाठी स्वतंत्र लिफ्टची चर्चा सोशल मीडियाच्या चर्चेत राहिली आहे. पुणे सोसायटीच्या या नोटीसमध्ये, सर्व पाळीव प्राणी, घरगुती नोकर आणि इतर सर्व सेवा कर्मचार्‍यांना नोटीसमध्ये नमूद केलेली लिफ्ट वापरण्यास सांगितले आहे. यानंतर हा भेदभाव करणारा निर्णय असल्याची जोरदार टीका होत आहे.


तुम्ही देखील सूचना वाचा



संदीप मनुधने या ट्विटर यूजर्सने शेअर केलेले फोटोत लिफ्टच्या दरवाजा दिसत आहे ज्याच्या बाहेर नोटीस आहे की 'घरात काम करणाऱ्या नोकरांनी लिफ्ट सी किंवा डी वापरावी'. त्याचवेळी, त्याच्या शेजारी चिकटवलेल्या पेपरमध्ये 'दूधवाले, वृत्तपत्र फेरीवाले, कुरिअर डिलिव्हरी बॉय, मजूर, 'डी' लिफ्ट वापरा' असे लिहिले आहे. या पोस्टवर त्यांनी समाजातमध्ये फूट पाडणे हा भारतीयांचा नैसर्गिक गुण असल्याची कॅप्शन दिली आहे. पुण्यातील पॉश भागात राहणाऱ्यांनी ते सिद्ध केले.


कमेंट्सचा पाऊस


या ट्विटने अनेकांचे लक्ष वेधून घेतले, त्यामुळे लोक आपापल्या पद्धतीने यावर प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक म्हणाले की हा एक सामान्य ट्रेंड आहे जो देशाच्या अनेक भागांमध्ये सुरु आहे. कोणीतरी याला कोरोना युगाच्या कोविड प्रोटोकॉलशी जोडून पाहिलं, तर कोणी काहीतरी वेगळं सांगून या निर्णयाचा बचाव केला.


अनेक तर्कवितर्क


एका यूजरने लिहिले की, 'हा निर्णय घेतला असावा कारण आमच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावरुन खाली यायला 15 मिनिटे लागतात. त्याचवेळी, काही मुले आणि वृद्ध लोक पाळीव प्राण्यांना घाबरतात. कधीकधी तरुणांना फोबिया होतो आणि ही एक साधी बाब आहे, त्याला मुद्दा बनवण्याची गरज नाही.