TET exam Scam: आता बातमी आहे टीईटी (TET) घोटाळा प्रकरणाची. घोटाळेबाज शिक्षकांना मोठा दणका मिळाला आहे.टीईटी गैरप्रकारातील शिक्षकांचं वेतन रोखण्यात आले आहे. अपात्र ठरलेल्या 576 शिक्षकांचं ऑगस्टपासूनचं वेतन न देण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिलेत. परीक्षा परिषदेच्या यादीतील 7 हजार 874 उमेदवारांनी गैरप्रकार केल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आलंय. तसंच या उमेदवारांचा स्कूलरी आयडी गोठवण्यात आलाय. (trending news salary of teachers in TET malpractice has been withheld big news in marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2019- 2020 मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा झाली होती. या परीक्षेमध्ये गैरप्रकार झाला असल्याचे समोर आले होते. हा TET घोटाळा उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली होती. यानंतर पुणे सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात आला. या तपासात धक्कादायक वास्तव समोर आले. यामध्ये तब्बल 7 हजार 874 उमेदवार गैरप्रकारात सहभागी होते. 



टीईटी परीक्षेचा निकाल 28 ऑगस्ट 2020 लागला होता. परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर हा निकाल जाहीर करण्यात आला होता. त्यावेळी 16 हजार उमेदवार हे पात्र ठरलेले होते. यापैकी अनेक उमेदवार हे घोटाळा करुन पास झाल्याचे धक्कादायक खुलासा समोर आला. यासोबतच 2013 पासून शिक्षक पात्रता परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात आली होती.टीईटी घोटाळ्यामध्ये पोलिसांकडून शिक्षण परिषदेचा माजी अध्यक्ष तुकाराम सुपेला अटक करण्यात आली होती. यासोबतच शिक्षण परिषदेचा माजी आयुक्त सुखदेव ढेरे, जी ए टेक्नॉलॉजी कंपनीचा प्रमुख प्रितेश देशमुख अशा अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे.