Nagpur Swine Flu  - आता बातमी आहे महाराष्ट्राच्या चिंतेत भर घालणारी. नागपुरात (nagpur) स्वाइन फ्लूचे (swine flu) रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.नागपुरात दरदिवसाला 2 रुग्णांची नोंद होते आहे. नागपुरात जुलैच्या शेवटच्या 15  दिवसांमध्ये स्वाइन फ्लूचे 28 रुग्णांची नोंद झाली होती. विशेष म्हणजे 29 ते 31 जुलै या तीन दिवसांत 21 प्रकरणांची (case) नोंद झाली आहे . (trending news swine flu found in nagpur nmc took this step what is swine flu and symptoms in marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूरमधील मेडिकल आणि पालिका अधिकाऱ्यांना नोंद झालेल्या रुग्णांपेक्षा जास्त लोकांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याची भीती वाटत आहे. 
जिल्हा आरोग्य कार्यालयाच्या (DHO) आकडेवारीनुसार सोमवारी आणि मंगळवारी 12 जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. 


पालिका अधिकाऱ्यांचं 'मिशन स्वाइन फ्लू'



नागपुरात स्वाइन फ्लूचे रुग्णांची संख्या पाहता जिल्ह्यात नागपूर महापालिका सतर्क झाली आहे. त्यामुळे पालिका खबरदारीचा उपाय म्हणून आता अधिकारी घरोघरी भेट देत आहेत. तर या आजाराबद्दल लोकांमध्ये जागृता निर्माण करत आहेत. 


स्वाइन फ्लूची लक्षणं सामान्य फ्लूसारखी 


स्वाइन फ्लूची लक्षणं ही सामान्य फ्लूसारखी असल्याने नागरिकांकडून याकडे दुर्लक्ष केलं जातं आहे. त्यामुळे अनेक स्वाइन फ्लूच्या रुग्णांची नोंद झालेली नाही. या संसर्ग लक्षात येण्यासाठी लॅब चाचण्याची आवश्यकता असते. 


स्वाइन फ्लू म्हणजे नेमकं काय?


स्वाइन फ्लू हा श्वसननलिकेत होणारा संसर्ग आहे. इन्फ्लूएन्झा 'टाईप-A' च्या 'H1N1' विषाणूमुळे हा आजार होतो. या आजारात नाक, घसा आणि फुफ्फुसातील पेशींवर परिणाम होतो. 


'स्वाइन फ्लू'ची लक्षणं 


102 ते 103 पर्यंत ताप 
थंजी वाजणे
कफ 
घसादुखी 
अंगदुखी
डोकेदुखी
खूप जास्त थकवा
डायरिया 
उलट्या


'या' गोष्टींची काळजी घ्या


खोकलताना किंवा शिंकताना नाका-तोंडावर रुमाल ठेवा
हात सतत धुवा
डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श टाळा
गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका
त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या
डॉक्टरांनी सांगितल्यास रुग्णालयात भरती व्हा