Viral Video, Ajjibai dance: सोशल मीडिया या नवमाध्यमामुळे कम्युनिकेशनमध्ये झपाट्यानं वाढ झाल्याचं पहायला मिळतं. सोशल मीडियावर अनेक आगळेवेगळे व्हिडीओ (Social Media Viral Video) व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ हादरवणारे असतात. तर अनेक व्हिडीओमुळे लोकांचं मनोरंजन देखील होतं. अशातच सध्या सोशल मीडियावर एका आज्जीबाईंचा भन्नाट व्हिडीओ (Trending Video Of Ajjibai) व्हायरल होताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समाजाच्या दबावामुळे अनेकदा महिलांना दबक्या भूमिका साकाराव्या लागतात. महिलांना कधी मोकळेपणाने नाचता देखील येत नाही. मात्र, संधी मिळाल्यावर महिला सोनं करताना दिसतात. अशातच आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. झी मराठी वरील होम मिनिस्टर (New Home Minister) या कार्यक्रमातील हा व्हिडीओ आहे.


आणखी वाचा- T20 World Cup : अचानक Warner राईटी खेळायला लागला अन् झालं असं काही की....बॉलरही पोटधरून हसला!


न्यू होम मिनिस्टर या इंस्टाग्राम अकाऊंटवरून (Instagram Account) शेअर करण्यात आलाय. शांताबाई हे गाणं सुरू असतं. कार्यक्रमात रॅप्म वॉक सुरू असतो. त्याचवेळी एका हिरव्या साडीतील आजीबाईंची एन्ट्री होते. आजीबाईंचा रॅप्म वॉक (Ramp Walk) पाहून अनेकजण आवाक् झाले आहेत. समोर आल्यावर आजीबाईंनी फ्लाईंग किस्स (Flying KISS) देखील दिली. आजींचा आत्मविश्वास बघून अनेकांनी टाळ्या वाजवल्या आहेत.


पाहा व्हिडीओ- 



दरम्यान, आज्जीबाईंचा हा व्हिडीओ अनेकांना प्रचंड आवडलाय. काही हजारो व्ह्यूज आणि लाईक्स या व्हिडीओला आले आहेत. रॅम्प वॉक सुरू असताना देखील आजींनी पदर खाली पडून दिला नाही, हे विशेष... अनेकांनी यावर देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. बाकी काहीही असो आज्जीबाई म्हणजे लय भारी!