पुण्यातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ट्रकची 2 कारला धडक, 4 ठार
पुण्यातून मुंबईच्या दिशेने सिमेंट घेऊन येणाऱ्या ट्रकने 2 कारला धडक दिली.
पुणे : पुण्यातून मुंबईच्या दिशेने सिमेंट घेऊन येणाऱ्या ट्रकने 2 कारला धडक दिली. या अपघातात कार 100 फूट दरीत कोसळली असून 4 जण जागीच ठार झाले आहेत. दोन ते तीन क्रेन घटनास्थळी असून त्यांनी कार वर काढली आहे. तसेच मृतदेहही ताब्यात घेण्यात येत आहेत. वाहतूकीचे नियम न पाळल्याने मुंबई पुणे महामार्गावर अपघाताच्या घटना नेहमी पाहायला मिळतात. या घटनेतही लेन तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न फसल्याचे म्हटले जात आहे.
सकाळी दहाच्या सुमारास सिमेंटचा ट्रक पुण्याहून मुंबईच्या दिशेने चालला होता. लेन क्रॉस करण्याच्या घाईत ट्रक कारला आदळला आणि कार मुंबई लेनहून पुण्याच्या लेन वर बोरघाटात पडली. यामधली 1 कार साधारण 100 फूट खाली दरीत पडली. ट्रक रस्त्यात पडला असून त्यातील सिमेंट रस्त्यावर पसरले आहे. त्यामुळे मुंबई पुणे वाहतूक काही काळ ठप्प झाली आहे. वाहतूक कोंडी सुटायला अजूनही तासभर जाण्याची शक्यता आहे.