रत्नागिरी : कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होत आहे. मुंबईकर गावी येत असल्याने कोरोना विषाणूचा प्रसाह होत असल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे कोरोनाविरोधात लढा अधिक तीव्र करण्यात येणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना विषाणू तपासणीसाठी गोवा राज्याच्या धर्तीवर ‘ट्रू नेट’ मशिन खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन्ही जिल्हयासाठी प्रत्येकी एक मशिन असेल. ती मशिन जिल्हा रुग्णालयात बसवण्यात येईल. ट्रू मशिनमधून केवळ निगेटिव्ह असलेल्यांचेच रिपोर्ट येतात. त्यामुळे रिपोर्ट निगेटिव्ह न आलेल्यांचे स्वॅब घेऊन ते पुढल्या तपासणीसाठी पाठवले जातील, असे उदय सामंत यांनी सांगितले. एका तासात चार जणांची तपासणी करण्याची या मशिनची क्षमता आहे. 


मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्याच्या तपासणी लवकर होईल. तासाला चार जणांची तपासणी होऊ शकेल, ज्यांचे अहवाल निगेटिव्ह येतील त्यांना हाेम काेराेन्टाइन करण्यात येईल .ज्याचा रिपोर्ट निगेटिव्ह येत नाही, त्याचे स्वॅब घेऊन ते मिरजला पाठविले जातील. त्यात त्याचा अहवाल पाॅझेटिव्ह आला तर त्याना रुग्णालयात दाखल केले जाईल. या मुळेअहवाल लवकर येऊन कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य होईल आणि लॅबवर ताण पडणार नाही. तसेच अहवालही लवकर मिळेल. येत्या आठ दिवसामध्ये ही मशिन येईल असेही सांमत यांनी सांगितले