Baramati News:  बारामती म्हणजे शरद पवारांचा बालेकिल्ला. पण आता हा बालेकिल्ला काबीज करण्यासाठी भाजपनं कंबर कसली. बारामती जिंकण्यासाठी भाजपची मोर्चेबांधणी सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने भाजपचा विश्वास आणखीच वाढला आहे. असे असताना आता थेट सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणुक लढवण्याचा दावा केला आहे. भाजपच्या तिकीटावर तृप्ती देसाई यांना सुप्रिया सुळेंविरोधता निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे आहे. बारामती हासुप्रिया सुळे यांचा मतदार संघ आहे. 


सुप्रिया सुळेंविरोधात लोकसभा निवडणुक लढवणार असल्याचा दावा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तृप्ती देसाई शिर्डीत साई दरबारी आल्या होत्या. यावेळी बारामतीतुन  सुप्रिया सुळेंविरोधात लोकसभा निवडणुक लढवणार असा दावाही देसाईंनी केलाय. सुप्रिया सुळे जर मविआच्या उमेदवार असल्या तर भाजपाकडुन मी उमेदवारीसाठी इच्छूक असल्याचं तृप्ती देसाई म्हणाल्या. 


भाऊ आहेत तर त्यांच्यासोबत भाजपात जा - सुप्रिया सुळेंना तृप्ती देसाईंचा सल्ला


राज्यातील राजकारण सध्या कोणत्या दिशेने चाललय ? असा सवाल देसाई यांनी उपस्थितीत केलाय. अजीत पवार हे भारतीय जनता पार्टी सोबत गेले. दुसरीकडे सुप्रिया सुळे म्हणतात आमच्या राष्ट्रवादीत फुट पडली नाही. असो तुमच्या राष्ट्रवादीत फुट पडली नाही अस म्हणतायत. मात्र, जनतेच्या पायात बुट आहे ना तो बुट जर आता मतांद्वारे तुम्हाला पडला की मग तुम्हाला कळेल लोकांना फसवता येणार नाही. त्यामुळे जे आहे ते स्पष्ट बोला ते तुमचे भाऊ आहेत तर तुम्ही त्याच्या बरोबर भाजपात जा असा सल्ला देखील ‌तृप्ती देसाई यांनी सुप्रिया सुळे यांना ‌दिला आहे. 


काँगेस आणि भाजपकडून निवडणुक लढवण्याची ऑफर 


सुप्रिया सुळे बारामतीतून तीन वेळा खासदार झाल्या आहेत. या वेळी मला वाटल होत राष्ट्रवादी एखाद्या कार्यकर्त्यांला बारामतीतून संघी देईल मात्र सुप्रिया सुळे स्वतःच तयारी करत आहेत. त्यांच्या मतदार संघात अनेक कामे झालेली नाहीत लोकांना त्यांच नेतृत्व मान्य नाही त्यामुळे त्यांच्या विरोधात मी बारामतीतुन लोकसभा लढवणार असा दावा देसाई यांनी केला आहे. सुप्रिया सुळे जर महाविकास आघाडीच्या उमेदवार असल्या तर भारतीय जनता पार्टी कडुन मी उमेदवारी करण्यास इच्छूक असल्याच देसाई यांनी सांगत भाजपने माझ्या सारख्या कार्यकर्तीला उमेदवारी दिली तर नक्कीच बारामतीत बदल घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. बारामतीसाठी भाजपा आणि कॉग्रेस दोन्ही पक्षाकडुन मला फोन आले आहेत. मात्र सध्याची राजकीय परिस्थीती पहाता मी पुढील चर्चा केलेली नाही. मात्र त्या महाविकास आघाडीच्या उमेदवार तर मी भाजपाची त्या भाजपात गेल्या तर मी महाविकास आघाडीची उमेदवार असणार असा दावा देखील देसाई यांनी केला आहे.