नाशिक : नाशिक महापालिकेच्या सफाई विभागातील इतर सेवेत काम करणा-या अडीचशे कर्मचा-यांच्या बदल्या पुन्हा सफाई विभागात करण्यात आल्यात. 


राजकीय वरदहस्तामुळे यापूर्वी बदल्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक राजकीय वरदहस्त असलेल्या कर्मचा-यांची साफसफाई मुंढे यांनी केली. त्यामुळे राजकीय तो-यात राहण्या-या कर्मचा-यांना आता हातपाय चालवीत शहराची धूळ साफ करावी लागणार आहे. 


सफाई कर्मचारीच कमी पडत होते


यात अनेक कर्मचारी पदाधिका-यांच्या दिमतीला होते. तर कुणी पीए म्हणून कार्यरत होते. या कर्मचा-यांसोबत राजकीय नेत्यांनाही यामुळे आता चाप बसणार आहे.


तुकाराम मुंढे हे आयएएस अधिकारी आहेत, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. यापूर्वी नवी मुंबई, आणि पुण्यात त्यांनी त्यांचा कामाचा प्रभाव पाडला आहे.