नागपुरात तुकाराम मुंढेंच्या घराबाहेर समर्थकांची गर्दी
मुंढे समर्थक आणि पोलिसात बाचाबाची
नागपूर : नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली मुंबईत करण्यात आली. तुकाराम मुंढेंना कोरोनाची लागण झाली होती. त्याकाळातच ही बदली करण्यात आली होती. आज ते मुंबईला रवाना झाले. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने नागपूरकरांनी त्यांच्या घराबाहेर गर्दी केली.
'We Want Munde Sir','आगे आगे मुंढे पीछे पड गये गुंडे' तुकाराम मुंढेच्या समर्थन करणाऱ्या नागपूरकरांनी यावेळी या घोषणा केल्या. यावेळी मुंढे समर्थक आणि पोलिसात बाचाबाची देखील झाली. कोविड नियमांचे उल्लंघन होत असल्याने पोलिसांनी सामर्थकाना हटकले. यावेळी पोलीस फोर्स वाढवण्यात आला आहे.
मुंढेच्या निवासस्थानाबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. . तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी अशी ओळख असलेले तुकाराम मुंढे वर्षाच्या सुरुवातीला राज्याच्या एड्स नियंत्रण प्रकल्पाचे संचालक म्हणून काम पाहत होते. जानेवारी महिन्यातच नागपूरचे महापालिका आयुक्त म्हणून बदली झाली होती. त्यानंतर अवघ्या सात महिन्यात त्यांची पुन्हा एकदा ट्रान्स्फर ऑर्डर निघाली आहे.