पुणेकर Flirting मध्येही अव्वल! `तू पेन्सिल आहेस का?` एफसी रोवडर तरुणाची तरुणीला खास चिठ्ठी
Pune Flirt : `पुणे तिथे काय उणे` मग हे पुणेकर Flirt करण्यात तरी कसे मागे राहतील. (Pune Boy Flirt Girl At FC Road Pune)तरुणाची एक चिठ्ठी सोशल मीडियावर चांगली व्हायरल होत आहे. FC Road या पुण्यातील गजबजल्या रोडवर तरुणाने तरुणीला चक्क `तू पेन्सिल आहेस का?` असं विचारलं आहे. याचा अर्थ नेमका काय? (Viral News)
Pune Boy Propose Unique Style : किशोरवयात प्रेमात पडणे ही अतिशय गोड भावना असते. या वयात Flirting करण्यात एक विशेष आनंद असतो. आपल्या मनातील भावना समोरच्या व्यक्तीला वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगणे यालाच तर फ्लरटिंग असं म्हणतात. यासाठी अनेकजण वेगवेगळी शक्कल लढवतात. तरुणाची अशीच एक युक्ती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पुण्यातील FC रोड सारख्या गजबजलेल्या ठिकाणी एका तरुणाने तरुणीसोबत हटके स्टाईलने Flirt केलं आहे. तरुणाने एक चिठ्ठी दिली. ज्यामध्ये त्याने आपली भावना व्यक्त केली. पण हिच चिठ्ठी त्या तरुणीने सोशल मीडियावर व्हायरल केली आहे.
Flirting ची हटके स्टाईल
एक्सवर म्हणजे ट्विटरवर @gannergworl नावाच्या अकांउटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. तरुणीने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “एफसी रोड तुम्हाला वेड लावू शकतो. मी रस्त्यावरून जात होते आणि एका व्यक्तीने मला एक चिठ्ठी दिली आणि म्हणाला की, ‘ही तुमची चिठ्ठी खाली पडली होती’” चिठ्ठीत काय लिहिले होते याचा फोटोही शेअर केला आहे. खरी गंमत तर पुढे आहे. फोटोमध्ये दोन ओळी लिहिल्या आहेत. “तू पेन्सिल आहेस का? लांबून पाहिल्यावर अप्सरा दिसत आहेस?” (‘तुम पेंसिल हो क्या? दूर से अप्सरा दिख रही हो…’).
तरुणीची सोशल मीडिया पोस्ट
अप्सरा पेन्सिल
'अप्सरा' नावाच्या ब्रँडची एक पेन्सिल आहे. तसेच सुंदर महिलांच कौतुक करताना अनेकदा 'अप्सरा' असा उल्लेख केला जातो. तर या दोन्ही 'अप्सरा' या शब्दांमध्ये मेळ घालत तरुणाने Flirt केलंय. मराठी भाषा वळवावी तशी वळते... तरुणाने या सगळ्याचा फायदा घेत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या या दोघांची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. हिंमतीला दाद दिली जात आहे. तुम्ही देखील आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी नक्कीच अशा वेगवेगळ्या पद्धतींचा स्वीकार करत असालच.
प्रेमाला भाषेचं बंधन नसतं
प्रेम व्यक्त करायला ठराविक अशी भाषा नाही. अगदी नजरेने किंवा स्पर्शानेही आपण प्रेम व्यक्त करता येते. प्रेम ही अशी भावना आहे जी व्यक्त करणे गरजेची आहे. पुण्यातील या तरुणाने आपली भावना खास चिठ्ठी लिवून व्यक्त केली आहे.