नाशिक : गुन्हेगारी टोळ्यांच्या संघर्षात एका कोवळ्या मुलाचा हकनाक बळी गेल्याचा धक्कादायक प्रकार, नाशिकमध्ये घडला आहे. नाशिकमध्ये तुषार साबळे या १५ वर्षांच्या मुलावर काल दिवसाढवल्या जीवघेणा हल्ला झाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या हल्ल्यात तुषार साबळेचा मृत्यू झाला. नाशिक रोडवरच्या मंगलमूर्ती भागात ही हादरवून टाकणारी घटना घडली होती. 3 - 4 गाड्यांमधून आलेल्या हल्लेखोरांनी दहशत माजवत, धारधार शस्त्रांनी हा हल्ला केला होता. या हत्या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. 


8 दिवसांपूर्वी पंचवटी परिसरात किरण निकम या गुन्हेगाराचा खून झाला होता. त्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हे गुंड आले होते. मात्र दिसण्यातल्या साधर्म्यामुळे त्यांनी निष्पाप तुषारचा बळी घेतला.