धो धो पाऊस, नदीला पूर; बाईकसह वाहून गेलेले दोघे रात्रभर झाडावर, त्यांची अशी सुटका
Two bikers washed away in the flood In Nanded : पुराच्या पाण्यात जाण्याचे कोणीही धाडस करु नये, असे आवाहन करुनही काहीजण धाडस करत आहेत. मात्र, हे धाडस त्यांच्या जीवावर बेत आहेत. अशीच एक घटना नांदेड येथे घडली.
सतिश मोहिते, नांदेड : Two bikers washed away in the flood In Nanded : राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पडझडीच्या घडना घडल्या आहेत. काही ठिकाणी दरडी खाली आल्यात. घरांचे नुकसान झालेत. तर अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. पुराच्या पाण्यात जाण्याचे कोणीही धाडस करु नये, असे आवाहन करुनही काहीजण धाडस करत आहेत. मात्र, हे धाडस त्यांच्या जीवावर बेत आहेत. अशीच एक घटना नांदेड येथे घडली. पाण्याच्या प्रवाहातून दुचाकीवर जाण्याच्या प्रयत्नात असणारे दोघे जण वाहून गेले. सुदैवाने हाती झाड लागल्याने ते काल रात्रीपासून झाडावर होते. त्यांची आज सुखरुप सुटका करण्यात आली.
पुराच्या पाण्यातून वाहून जाणारे दोघे जण रात्रभर झाडावर अडकले होते. या दोघांची एसडीआरएफच्या पथकाने सुखरुप सुटका केली. नांदेड मुदखेड रोडवर इजळी जवळील सीता नदीला पूर आला होता. पुराचे पाणी पुलावरुन जात होते आहे. असे
असताना धाडस करत पाण्यातून दोघेजण आपल्या दुचाकीवरुन जाण्याचा प्रयत्न करत होते. पुराचा मोठा लोंढा आला आणि ते वाहून गेले.
मुदखेड येथील दीपक शर्मा आणि बारड येथील सावळा शिंदे हे दोघे आपापल्या दुचाकीवरुन जाण्याचा प्रयत्न करत होते. पण दोघेही दुचाकीसह वाहून गेले. सुदैवाने एका लिंबाच्या झाडाला दोघांनीही पकडले. मोबाईलवरुन त्यांनी संपर्क साधला. एसडीआरएफची टीम आणि जिल्हाधिकारी इटनकर रात्रीच घटनास्थळी पोहोचली. पण रात्री त्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढणे शक्य झाले नाही. सकाळी दोघांची सुखरुप सुटका करण्यात आली.
दोन तरुण पुरात वाहून गेलेत
सुरगाण्याच्या गुलाबी गाव अर्थात भिंतघर येथील दोन तरुण पुरात वाहून गेलेत. हे तिघे तरुण जामनेमाळच्या फरशी पुलावर वाहत्या पाण्यातून मोटार सायकलने जात होते. वाहत्या पाण्यातून वाट काढताना तिघही पडले. या अपघातात तर मागे बसलेला प्रभाकर सुदैवाने बचावला. परंतु आबाजी कडाळी, विजय वाघमारे दोघे वाहून गेलेत. प्रशासनाकडून शोध मोहीम सुरु आहे.