केटीवेअरमध्ये बुडून बहिण-भावाचा मृत्यू
संगमनेर तालुक्यातील सावरचोळ येथे केटीवेअरमध्ये बुडून बहीण भावाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. तेजल भगवंता कानवडे आणि ओम भगवंता कानवडे असे मृत झालेल्या दुर्दैवी भाऊ बहिणींची नावे आहेत.
अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील सावरचोळ येथे केटीवेअरमध्ये बुडून बहीण भावाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. तेजल भगवंता कानवडे आणि ओम भगवंता कानवडे असे मृत झालेल्या दुर्दैवी भाऊ बहिणींची नावे आहेत.
ही दोन्ही मुले गावातील शाळेत शिकत होती. शनिवारी शाळा सुटल्यावर ही मुले घरी आणि अंघोळीसाठी केटीवेअरकडे गेली. सायंकाळी ६ वाजले तरी दोघेही घरी आली नाही म्हणून त्याचा शोध घेण्यात आला.
शोध घेत असताना जांभूळ शिवारातील केटीवेअरमध्ये कपडे तरंगताना आजोबा धोंडिबा कानवडे याना दिसले. ओम याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. तेजल पाण्यातील गाळात रुतली होती. ग्रामस्थांच्या मदतीने सदर मृतदेह बाहेर काढण्यात आले.