टकमक टोकावरून दोघे खाली कोसळलेत, शोध सुरु
रायगड जिल्ह्यातील टकमक टोकावरून दोघे खाली कोसळलेत. किल्ले रायगडावरील ही घटना असून दोघांचा शोध घेण्यात येत आहे.
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील टकमक टोकावरून दोघे खाली कोसळलेत. किल्ले रायगडावरील ही घटना असून दोघांचा शोध घेण्यात येत आहे.
एक वीस वर्षीय तरुण आणि पंधरा वर्षीय मुलगी किल्ले रायगडावर गेले होते. तेथे ते फोटो काढत असल्याचा अंदाज वर्तविण्यात आलाय. यावेळी ते टकमक टोकावरुन कोसळल्याची माहीती प्राथमिक आहे.
महाड तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दोघांचाही शोध सुरु आहे. हे दोघे आदिवासी समाजातील असल्याचे वृत्त आहे. लता रामा मुकणे, असे मुलीचे नाव असून मुलाचे नाव समजू शकलेले नाही. मात्र, त्याला सोनू या नावाने ओळखले जाते.