कल्याणमध्ये दोन गटांत राडा, दगडफेकीत ७ पोलीस जखमी
पूर्व भागात दोन गटांत तुफान राडा झाला. त्यानंतर येथे अद्यापही तणावाची स्थिती आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात शेकडोंचा जमाव झाल्याने तणाव वाढला.
कल्याण : पूर्व भागात दोन गटांत तुफान राडा झाला. त्यानंतर येथे अद्यापही तणावाची स्थिती आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात शेकडोंचा जमाव झाल्याने तणाव वाढला.
जमावाने कल्याणचे एसीपी दत्तात्रय शिंदे यांच्या गाडीवर दगडफेक करत तोडफोड केली. या हल्ल्यात एकूण ७ पोलीस जखमी झालेत. त्यापैकी ३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान, सर्व अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. त्यामुळे कल्याण पूर्वेला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. जमावाने केलेल्या दगडफेक आणि मारहाणीत एक एसीपी, कल्याणचे डीसीपी संजय शिंदे किरकोळ जखमी झालेत. तर एसीपी दत्तात्रय शिंदे यांच्या गाडीवर दगडफेक करत गाडीची तोडफोड केली.