चंद्रपुरात दोन जहाल नक्षलवाद्यांना अटक, लावले होते २५ लाखांचे बक्षिस
पोलिसांनी बल्लारपुर रेल्वेस्थानकावर दोन जहाल नक्षलवादयांना सापळा रचून अटक केलीये. रामन्ना आणि पद्मा अशी यां दोघांची नावं असून ते पती-पत्नी आहेत.गडचिरोली पोलिसांनी ही माहिती दिली.
चंद्रपूर : पोलिसांनी बल्लारपुर रेल्वेस्थानकावर दोन जहाल नक्षलवादयांना सापळा रचून अटक केलीये. रामन्ना आणि पद्मा अशी यां दोघांची नावं असून ते पती-पत्नी आहेत.गडचिरोली पोलिसांनी ही माहिती दिली.
रामन्ना हा दंडकारण्य स्पेशल झोनल कमेटी मेम्बर असून त्याच्यावर २५ लाखांचे बक्षीस जाहीर आहे, पद्मा ही एरिया कमेटी मेम्बर असून तिच्यावर ६ लाखांचे बक्षीस जाहीर आहे. हे दोन्ही नक्षली लाहेरी पोलिस स्टेशनचे "वॉन्टेड" आहेत. त्यामुळं अटक केल्यानंतर त्यांना लगेच गडचिरोली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं.
रामण्णाचं दुसरे नाव 'टेक रामण्णा ' असे असून तो तंत्रपारंगत आहे. नक्षल चळवळीतील तंत्रविषयक बाबींची जबाबदारी त्याच्यावर होती. स्फोटके आणि शस्त्र तयार करणे, त्यात संशोधन करणे, ही मोठी जबाबदारी त्याच्याकडे होती. गेली ३० वर्षे हे नक्षली दाम्पत्य सशस्त्र कारवायांमधे सक्रीय होतं.