ओव्हरटेकींगच्या वादातून एसटी वाहकाला मारहाण
मुंबई : ओव्हरटेकींगच्या वादातून एसटीवाहकाला काही तरूणांनी मारहाण केल्याची घटना नागपुरात घडलीय. सोमलवाडा परिसरात शुभम चौकात ही घटना घडली. पोलिसांनी हर्षल बनसोड आणि मयूर इंगोले या दोन तरूणांना अटक केलीय. पुलगाव नागपूर एसटी सोमलवाडा चौकात थांबली होती... त्यातून प्रवासी उतरत होते. त्याचवेळी कारमधून आलेल्या चौघा मद्यधुंद अवस्थेतल्या तरूणांनी बसवाहक सलीम इस्माईलला बसमध्ये घुसून शिवीगाळ आणि मारहाण केली. बसच्या काचाही फोडल्या. वाहतूक पोलिसांनी त्यातल्या दोन तरूणांना पकडलं.