कांद्याच्या चोरीप्रकरणी दोघांना अटक
देशात कांद्याच्या दराने १०० रूपयांचा आकडा गाठला आहे.
मुंबई : देशात कांद्याचे भाव सतत वाढत आहेत. त्यामुळे सर्व सामान्य लोकांच्या महिन्याच्या हिशोबाचं गणित कोलमडून गेलं आहे. देशात चांगल्या प्रतीच्या कांद्याचा दर ८० ते १०० रूपयांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर सतत वाढत आहे. कांद्याच्या वाढत्या दराचे वाईट परिणाम आता जाणवू लागले आहेत. महाराष्ट्रात कांदा चोरीची प्रकरणं समोर येवू लागली आहेत. कांद्याच्या वाढत्या दरांमुळे कांद्याची होणारी लूट चर्चेचा विषय ठरत आहे.
पुण्यामध्ये ५५० किलो कांदा चोरीला गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे आता कांद्याच्या दर वाढीवर चिंता व्यक्त केली जात आहे. कांदा चोरीच्या आरोपाखाली दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
पुण्यातील मौजे देवजली गावातून आरोपींनी कांदा चोरून नेला आहे.
पोलिसांच्या सांगण्यानुसार संजय पराधी आणि पोपट काळे असं कांदा चोरणाऱ्या अरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पुण्याच्या नारायण गाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान विदर्भात कांद्याची लागवड चांगल्या प्रकारे होते. तरी देखील पुण्यात कांद्याचे १०० रूपये किलो असे आहेत. परतीच्या पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. म्हणून याकाळात कांद्याचे दर वाढले आ