लष्करी भागातून दोन तोतया अधिकाऱ्यांना अटक
नाशिकच्या देवळाली कॅम्प येथील घटना, आठ दिवसात दुसरी घटना
आठ दिवसात नाशिकच्या लष्करी छावणी परिसरात तीन तोतया अधिकाऱ्यांना अटक आकारण्यात आली आहे. २८ डिसेंबरला तोफखाना केंद्रात गणेश वलू पवार या तोतया अधिकाऱ्याला अटक करण्यात आली होती. तर बुधवार ५ जानेवारी ला अजून दोन तोतया लष्करी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली असून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहम्मद असद मुजिबुल्लाखान पठाण (रा. रेहमान नगर, देवळाली कॅम्प) आणि आफताफ मन्नान शेख उर्फ मेजर खान (रा. आडकेनगर, देवळाली कॅम्प) अशी दोघ संशयित आरोपीचे नाव असून दोघही देवळाली कॅम्प येथील राहणारे आहेत.
बुधवार (५ जानेवारी) रोजी लष्कराचा गणवेश घालून लष्करी छावणी परिसरात गाडीवर आर्मी लिहिलेला एक व्यक्ती (मोहम्मद असद मुजिबुल्लाखान पठाण) देवळाली कॅम्पच्या प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करत होता. लष्कराच्या हद्दीतील गेट नंबर ७ वर तैनात असलेल्या जवानाने गाडीवर आर्मी लिहिलेल बघितले. जवानाला हा व्यक्ती संशयास्पद वाटला.
लष्करी जवानाने त्याचे ओळखपत्र मागितले. यावेळी त्याने माजी सैनिक असल्याच सांगून एक्स इंडियन आर्मी सिक्युरिटी सर्व्हिसेस अशा नावाचे ओळखपत्र दाखवले. दाखवलेले ओळखपत्र बनावट असल्याचा संशय आल्यानं याबाबत गेटवरील जवानाने देवळाली कॅम्पच्या मुख्य कार्यालयात कळविले. यानंतर आर्मी इंटेलिजन्स आणि लष्करी पोलिसांनी चौकशी केली असता ओळखपत्र आफताफ मन्नान शेख उर्फ मेजर खान याने बनवून दिल असल्याच संशयित आरोपीने सागितले.
आफताफ मन्नान शेख उर्फ मेजर खान ला चौकशीसाठी बोलावण्यात आले असता तो मोठ्या गाडीतून आला. या गाडीवरही आर्मी असे लिहिलेले होते. आफताफ मन्नान शेख उर्फ मेजर खानची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तर दिली. त्याच्या जवळील मोबाईल मध्ये लष्करी गणवेश घातलेले फोटो, लष्कराचे ओळखपत्र आणि संशयास्पद फोटो मिळून आले आहेत.