रायगड : अलिबाग समुद्रात दोन पर्यटक बुडाल्याची घटना घडली. कुलाबा किल्ल्यातून परतताना ही दुर्घटना घडली. दरम्यान, बेपत्ता पर्यटकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांचा शोध लागला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 रसायनी येथील एका कंपनीतील पाच जण किल्ला पाहण्यासाठी गेले होते. भरती सुरु झालेली असताना, अलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ला पाहून किनाऱ्याकडे ते परतत होते. दरम्यान, भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने यातील दोघे जण बुडाले आणि बेपत्ता झालेत.


सौरभ खान (मध्यप्रदेश) , ऋषभ सिव्हा (गोवा) हे दोघे समुद्रात बुडून बेपत्ता झाले आहेत. दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास ही  घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दोघांचा शोध घेण्यासाठी  अलिबाग कोळी बांधवांच्या सहकार्याने बोटी उपलब्ध करुन दिल्या, परंतु या शोध कार्यास यश आलेले नाही.