कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड :  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे. छत्रपती शिवाजी महाराज आदर्श होते पण ते जुन्या काळात असं कोश्यारी म्हणाले.  त्यांच्या वक्तव्यावर शिंदे गटाचे नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत(Industries Minister Uday Samant) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छत्रपती शिवाजी महाराज हे देशाच आराध्य दैवत आहेत. राज्यपाल यांनी वक्तव्य काय केल हे माहीत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्याबद्दल बोलताना आदराने आणि सन्मान बोललं पाहिजे ही महाराष्ट्राची संस्कृती असल्याचं सामंत यांनी म्हटलं आहे.


काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर देखील उदय सामंत टीका केली आहे. स्वातंत्र्यवीर  सावरकर यांच्यावर टीका करण्या इतकं आपल्या देशांत कोणीही मोठं नाही. राहुल गांधी आपल्या यात्रेमध्ये भारत जोडण्यासाठी नाहीतर स्वतःच वजन कमी करण्यासाठी चालत आहेत अशी खोचक टीका उदय सामंत यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे.  पिंपरी- चिंचवड शहरात लघु उद्योग संघटना, उद्योजक मेळाव्या निमित्त आले होते. तेव्हा ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


नेमकं काय म्हणाले राज्यपाल


छत्रपती शिवाजी महाराज तर जुन्या युगातील आहेत. नव्या युगात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉक्टर नितीन गडकरी पर्यंत इथेच आदर्श मिळतील," असे भगतसिंह कोश्यारी म्हणाले. औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवार यांना डी. लिट ही पदवी देण्यात आली. या सोहळ्यानंतर बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी, छत्रपती शिवाजी महाराज तो पुरानी बात हे, असे म्हटलं आहे.