Uday Samant : राज्याच्या राजकारणात सध्या नाट्यमय घडामोडी घडत आहेत. माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस पक्षातील बडे नेते अशोक चव्हाण यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.  अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर शिदे गटाचे नेते तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. लातूर मध्ये सुरू असलेल्या नाट्य संमेलनात ते बोलत होते.


मी राजकारणात आलो नसतो तर मी एक मोठा कलाकार असतो


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी राजकारणात आलो नसतो तर मी एक मोठा कलाकार म्हणून या नाट्य संमेलनात आलो असतो असं विधान उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले आहे.  लातूर मध्ये नाट्य संमेलन सुरु आहे. लातूर मध्ये राज्य शासनाचा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने 100 व्या नाट्य संमेलनाचे उद्घाटन पार पडले आहे. या उद्घाटन समारंभाला उद्योग मंत्री उदय सामंत, नाट्य संमेलनाध्यक्ष जब्बार पटेल, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आमदार संभाजी पाटील निलंगेकर उपस्थिती होते. 


राजकारणात रोजच नाट्यसंमेलन


आमच्या कडे इथे रोजच नाट्य संमेलन होत आहेत. कोण आमच्या बाजूने येऊन बसेल हे काही सांगता येत नाही. नाम उल्लेख न करता अशोक चव्हाण यांच्या भाजप पक्ष प्रवेशा वर उदय सामंत यांची मिश्किल टिप्पणी केली. आम्ही 16 महिन्यापूर्वी झेंडा हातात घेतला होता. काल एका नेत्यांना झेंडा हातात घेतला आहे. हे वर्ष निवडणुकीचा आहे. त्यामुळे आमच्याकडे रोजच नाट्य संमेलन होत आहेत. कोण आमच्या बाजूने येऊन बसेल हे काही सांगता येत नाही अशी मिश्किल टिप्पणी उदय सामंत यांनी केली.


प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. पूर्वी शिवाजी पार्कवर सभा घेणारे आता रस्त्यावर, चावडीवर सभा घेत आहेत‌ असं म्हणत उदय सामंत यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना डिवचले. उध्दव ठाकरे यांनी आपल्या पक्षाची प्रगती आहे की अधोगती आहे ते तपासावे असा सल्ला देखील उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. 


अखेर अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश


अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांनी भाजपचा झेंडा हाती घेतलाय. भाजप प्रदेश कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला. अशोक चव्हाण यांनी शुल्क भरुन भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं. भाजपसाठी आनंदाचा दिवस असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. तर आजपासून आयुष्याची नवी सुरुवात करतोय, असं अशोक चव्हाणांनी म्हटलंय.