हिंगोली : शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या ताफ्यावर हल्लाप्रकरणी पुणे पोलिसांनी मुंबईत मोठी कारवाई केली आहे. या हल्ल्याप्रकरणी हिंगोलीचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबन थोरात (Shivsena Leader Baban Thorat ) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. बबन थोरात यांनी आमदारांच्या गाड्या फोडा, असे चिथावणीखोर भाषण केलं होते. त्यानंतर त्याचे पडसाद पुण्यात दिसून आले. याप्रकरणी पुणे पोलिसांनी बबन थोरात यांना ताब्यात घेतले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उदय सामंत यांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांच्या कारवाईला वेग आला आहे. (Shiv Sainik vs Shinde group Rada in Pune) पुण्यातील ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातील कात्रजमध्ये शिवसैनिक विरुद्ध शिंदे गट असा राडा झाला. शिवसैनिकांनी शिंदे गटाचे बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाड्यांवर हल्ला केला.


युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंची सभा कात्रजमध्ये सुरू असताना तिथून सामंत यांच्या गाड्यांचा ताफा निघाला होता. सिग्नलला सामंतांची गाडी उभी असताना, शिवसैनिकांनी त्यांच्या गाड्यांवर हल्ला करुन गाडीच्या काचा फोडल्या.  याप्रकरणी सामंत यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पुण्यातील ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे यांना अटक करण्यात आली. मोरे यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आलीय. सभेचे मुख्य आयोजक संभाजी थोरवे यांनाही अटक करण्यात आलीय. त्यांच्यासह राजेश पळसकर, चंदन साळुंके, सूरज लोखंडे, रूपेश पवार यांना अटक करण्यात आलीय. त्याशिवाय 15 जणांना गुन्हा दाखल करण्यात आलाय.