सातारा : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे  भोसले यांनी पुन्हा एकदा EVM मशीन वर संशय व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी भाजप सराकवर जोरदार टीका केली. प्रगतशील देशांनी सुद्धा EVM नाकारले आहे मग आपल्या कडे का ? असा सवाल देखील उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे. सातारा लोकसभेचा मी राजीनामा देतो निवडणूक आयोगाने फेरनिवडणूक घ्यावी. लोकसभेत किती व्हायरस शिरलेत हे कोण सांगणार? लहान मुलांच्याकडून चिठ्या काढून आमदार खासदार निवडा, असा टोला सुद्धा त्यांनी यावेळी निवडणूक आयोगाला लगावला आहे. खासदार उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा हल्लाबोल चढवला. तसेच याबाबत सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी ‘मी खासदारकीचा राजीनामा देतो, सातारा मतदारसंघातली फेरनिवडणूक बॅलेट पेपरवर घ्या’, असे आव्हान त्यांनी निवडणूक आयोगाला आणि सरकारला दिले आहे. जे काय व्हायचे आहे ते होऊन जाऊ द्या.  ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानानंतर मतमोजणीत अनेक मतदारसंघातल्या मतांमध्ये फरक असल्याच्या तक्रारी आल्या. यासंदर्भात राज्यातल्या इतर उमेदवारांनीही निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेवर त्यांनी संशय व्यक्त केला आहे.