मुंबई : उदयनराजेंच्या दिलदारपणाचे अनेक किस्से आपण ऐकले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हल्ली उदयनराजे भोसले यांनी एका राकेश माने या तरूणाला महत्वाची मदत केली आहे. या मदतीमुळे त्या तरूणाची मोठी सोय झाली असून त्याच्या आनंदाला सीमाच उरली नाही. झालं असे की.... 


उदयनराजे रोजप्रमाणे बाहेर पडले तेव्हा प्रत्येक चौकात गाडीला हाथ दाखवुन मुजरा करून थांबणाऱ्या थोरा मोठ्यांना भेटत विचारपूस करत घाटाई मंदिराच्या कामाची पाहणी करण्यासाठी निघाले होते. घाटाई कडे जात असताना गणेश मंदिराच्या पुढील चडाला एक तरुण मागे सॅक लावून चालत चालला होता. महाराजांनी गाडी थांबविण्यास सांगितली आणि गाडी थांबताच जिप्सी न ओळखणाऱ्या त्या तरुणाने लक्ष दिले नाही परंतु चक्क मा.खा.छञपती महाराज उदयनराजे भोसले बोलवत आहेत हे पहाताच हा तरुण धावत मुजरा करत काही सुचत नाही अश्या अवस्थेत जवळ आला.


महाराजांनी त्याला विचारले कोठे चाललाय आणि चालत का ? तो तरुण उत्तर देण्यापूर्वीच छत्रपती उदयनराजे यांनी त्याला गाडीत घेतले आणि त्याला कॉलेज ला काय मदद हवी आहे का ?विचारले चालत का चालला आहे ह्या प्रश्नावर गाडी चुकल्याचे कारण सांगणाऱ्या ह्या तरुणास  उदयनराजे यांनी टू व्हिलर गाडी घेऊन देऊ असे सांगताच तो तरुण गहिवरला आणि त्या तरुणाला काही सुचेना ,त्याचा विनंतीवरून महाराज साहेबाबनी त्याला सेल्फी काढण्याची परवानगी दिली असता त्याने माझ्यासह4-5 सेल्फी घेतले