सातारा : आज साताऱ्यात नरेंद्र मोदी यांची सभा झाली. मोदींच्या स्वागतासाठी संपूर्ण सातारा सज्ज झालं होतं. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भवानी तलवार, चांदीची मुद्रा, मराठीशाही पगडी आणि मेघडंबरी भेट देण्यात आली. यावेळी उदयनराजे भोसले यांनी हिंदीमधून भाषण केली. या दरम्यान त्यांनी विरोधकांवर त्यांच्या शैलीमध्ये टीका केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचे लाडके आणि दूरदृष्टी असणारे पंतप्रधान यांचे स्वागत. सातारा ही चळवळीची भूमी आहे. देशरक्षणाची चळवळ या साताऱ्यातून सुरु झाली.  मोदीजींचे गुरू हे साताऱ्यातील.. त्यामुळे त्यांचं आणि साताऱ्याचं वेगळा संबंध आहे. मूठभर लोकांच्या हातात सत्ता आली आणि त्यांनी ती स्वतासाठी वापरली. त्यांनी निवडून आणल्यानंतर लोकांना गाळात घातलं. पण याच गाळातून कमळ उमललं.


मोदीजीने म्हणजे आयर्नमॅन आहेत. 370 सत्तर कलम काढून त्यांनी आयर्नमॅनची भूमिका बजावली. स्वयंघोषित नेत्यांनी मराठा आरक्षणासाठी काही केलं नाही. सातारामध्ये मेडिकल कॉलेज व्हावं अस कोणाला वाटलं नाही. पृथ्वीराज चव्हाण यांना देखील तस कधी वाटलं नाही. जे माझा बाराशाला उभे होते. ते आज माझ्या विरोधात उभे राहिले आहेत. अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर टीका केली.