रत्नागिरी : गुजरात काबीज करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 50 सभा घेतल्या. एवढं करूनही गुजरात हरले तर मोदींना देशात थारा असणार नाही, असा हल्लाबोव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीत केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकारवर टीकास्त्र बुधवारी सोडले. या वेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, जिथं अणूऊर्जा प्रकल्प असेल तिथं रिफायनरी नको, असं सांगतानाच आम्ही जनतेसोबत आहोत, अशी भूमिका त्यांनी राजापुरात मांडली.


शिवसेना हा भाजपचा सरकारी पक्ष भाजपसोबत याही पक्षाची राज्यात आणि देशात सत्ता आहे. मात्र, सत्तेत सहभागी झाल्यापासून हा पक्ष सातत्याने मित्रपक्ष भाजपवर हल्ला करत आहे. अनेकदा सरकारमधून बाहेर पडू असा इशाराही देत आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामातूनही अनेकदा राज्य आणि केंद्रातील सरकारचा समाचार घेतला जातो. या सततच्या टीकनेने भाजपही अस्वस्थ झाला आहे. परंतु, सत्तेत राहण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकमेकांना सांभाळून घेतले आहे.