मी शपथ घेतो की... उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत काय शपथ घेतली?
Uddhav Thackeray : दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी देखील उद्धव ठाकरेंसोबत शपथ घेतली.
Uddhav Thackeray Dasra Melava : मुंबईत झालेल्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना शपथ दिली. राज्य लूटारूंच्या हाती जावू देणार नाही अशी शपथ उद्धव ठाकरेंनी दिली.
मी शपथ घेतो की महाराष्ट्रात अंधकार घडवणाऱ्या दिल्लीतील शहांना रोखण्यासाठी मी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची मशाल बनून लढत राहील. मी शपथ घेतो की हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत शिवशाही महाराष्ट्रात आणण्यासाठी हीच मशाल धगधगत ठेवेन.
मी एक स्वाभिमानी महाराष्ट्र प्रेमी म्हणून शपथ घेतो की, 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेला महाराष्ट्र मी लुटारू आणि दरो़डोखोरांच्या हाती जाऊ देणार नाही. मी शपथ घेतो की, छत्रपती शिवराय आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांची भक्कम एकजूट उभी केली. ती मी अभेद्य ठेवेन. मी शपथ घेतो की महाराष्ट्रात अंधकार घडवणाऱ्या दिल्लीतील शहांना रोखण्यासाठी मी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची मशाल बनून लढत राहील. मी शपथ घेतो की हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत शिवशाही महाराष्ट्रात आणण्यासाठी हीच मशाल धगधगत ठेवेन अशी शपथ उद्धव ठाकरे यांनी घेतली.
सरकारने तीन लाख कोटी कंत्राटदारांवर उधळले - उद्धव ठाकरे
सरकारने तीन लाख कोटी कंत्राटदारांवर उधळले आहेत. राज्य सरकारची कर्ज घेण्याची मर्यादा असते. त्यांनी कर्ज काढून फटाके फोडत आहेत. सर्व समान्यांना दिवाळी साजरी करत असल्याचे दाखवत आहेत. आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती गंभीर आहे. अदाणींना बरंच काही दिलं आहे. चंद्रपूरच्या खदाणी, शाळा, धारावी, मिठागरे ही सर्व या सरकारने अदाणींना दिली. रक्त सांडवून आम्ही मुंबई मिळवली आहे. ही अदाणींनी भेट म्हणून दिलेली नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
धारावीचं कंत्राट रद्द करू उद्धव ठाकरे
अदानींच्या हातात मुंबईत देत असाल तर आमचं सरकार आल्यावर आम्ही धारावीचं कंत्राट रद्द करू, आम्ही तिथे पोलिसांना जागा देईल. वांद्रेची जागा आम्ही सरकारी कर्मचाऱ्यांना दिली होती. मात्र, शिंदेंनी हीजागा कोर्टाला दिली. आमचं सरकार आल्यावर आम्ही सरकारी कर्मचाऱ्यांना जागा देऊ, असं आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी दिले.