मुंबई : अंधेरीच्या पोटनिवडणूकीमध्ये (Andheri Bypoll Election)  निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि चिन्ह गोठवल्यामुळे (Shivsena Election Symbol Bow And Arrow) ठाकरे गटासाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह (CM Uddhav Thackeray Facebook Live) करत शिंदे गटावर टीका केली आहे. पक्षाचं नाव आणि चिन्ह गेल्यामुळे ठाकरे गटासाठी धक्का मानला जात असला तरी उद्धव ठाकरे यांनी आपण लढणार आणि संधीचं सोनं करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यासोबतच ठाकरेंनी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोरी करणाऱ्या आमदारांवर निशाणा साधला आहे. भाजपने त्यांचा वापर केला असून आता त्यांचं काम झालं आहे. तुमची बुद्धी गोठलेली नसेल तर माझं आजही तुम्हाला आव्हान आहे बाळासाहेबांचं नाव न वापरता जनतेसमोर या. स्वत: पक्ष काढा, भाजपमध्ये (BJP) जा पण तुम्हाला प्रत्येकवेळेला ज्या बाळासाहेबांनी जपलं, बाळासाहेब पाहिजेत पण बाळासाहेबांचा मुलगा नको. कारण तुम्हाला शिवसेना ठाकरे वगळून जी राहणार आहे ती गोशाळेत बांधायची असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. 


बंड करणाऱ्या नेत्यांना काळीज तर आहे, मात्र ते उलट्या काळजाचे आहेत. ते नेते थेट शिवसेना संपवायला निघाले आहेत. बाळासाहेबांचा पुत्र त्यांना मुख्यमंत्रिपदी नको होता. म्हणून त्यांनी भाजपच्या मदतीने मुख्यमंत्रिपद मिळवलं. इथंपर्यंत ठीक होतं, मात्र आता त्यांना तर शिवसेनाप्रमुख व्हायचं आहे. तुम्हाला आव्हान आहे की, तुमच्यात खरंच हिंमत असेल तर तुम्ही बाळासाहेब ठाकरे हे नाव न वापरता मैदानात या आणि निवडणूक लढवून दाखवा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.


उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला 3 चिन्ह आणि नावं दिलीत
त्रिशूल, उगवता सूर्य, मशाल ही तीन चिन्ह दिली आहेत, शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी 3 नावे दिली आहेत.