दहा दिवसात कचऱ्याची विल्हेवाट लावा- उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादेत पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्याचं म्हटलं जातंय..
औरंगाबाद : औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापौर आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात त्यांनी सगळ्यांचीच खरडपट्टी काढली. येत्या दहा दिवसांत कचरा प्रश्न सोडवा आणि तात्काळ रस्त्यावरील कचऱ्याची विल्हेवाट लावा, असे आदेश त्यांनी महापौर आणि पदाधिकाऱ्यांना दिले. या बैठकीत मीडियालाही परवानगी नव्हती. आम्हाला १० दिवसांची मुदत दिली, मात्र खरडपट्टी काढली नसल्याचा दावा महापौरांनी केला आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातील पोलिसांची गाडी धूर सोडत असल्यानं गुन्हा दाखल करण्याचे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदमांनी दिले आहेत. ताफ्यातील ही पायलट गाडी काळा धूर सोडत असल्यानं संबंधीत पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत.