नांदेड : शिवसेना आमदार हेमंत पाटील आणि खासदार विनायक राऊत यांच्यात वादावादी झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समक्ष या दोन नेत्यांमध्ये शुल्लक कारणावरुन बाचाबाची झाली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नांदेडमध्ये आयोजित शेतकरी संवाद सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आगमन झाले. तेव्हा आमदार हेमंत पाटील माईकवरुन पक्षप्रमुखांचे स्वागत करत होते. त्याचवेळी खासदार विनायक राऊत त्या ठिकाणी आले. दुसऱ्याला माइक देण्याची सूचना राऊत यांनी आमदार हेमंत पाटील यांना केली. 


मात्र माईक सोडण्यास हेमंत पाटील तयार नव्हते. माईक सोडायला सांगणाऱ्या राऊत यांना व्यासपीठावरच हेमंत पाटील यांनी झिडकारुन लावले. हा सर्व प्रकार भरसभेत घडल्याने याची मोठी चर्चा सुरू झाली. या प्रकारामुळे शिवसेना नेते आणि आमदारांमधील गटबाजी चव्हाटयावर आली.