Uddhav Thackeray on Shivaji Maharaj Statue Collapse: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर आदित्य ठाकरे आणि नारायण राणे यांचे कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. महाविकास आघाडीकडून आज मोर्चाचे आयोजन होते. तर अशात दुसरीकडे अचानक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर नारायण राणे तिथे पाहणीसाठी आले. त्यावेळी ठाकरे आणि राणे यांचे कार्यकर्ते भिडले. राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर मुंबईत महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi)  पत्रकार परिषदेत घेतली. महाराजांच्या पुतळ्याचं पुन्हा टेंडर काढून घोटाळा करणार, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष  उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केला. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पत्रकार परिषदेतून त्यांनी नारायण राणेंचं नाव न घेता हल्लाबोल केलाय. मोर्चादरम्यान मोदी शाहांच्या दलालांनी रस्ता अडवला, असा शब्दा त्यांनी खरपूस समाचार घेतला. कोकणवासियांना आता कळलं असेल. स्मारकारच्या कामात सुद्धा मोठा भ्रष्टाचार झालाय. पुतळा उभरण्याचे टेंडर काढून पुन्हा घोटाळा करणार आहे. जे मालवणला रस्ता अडवून बसले ते शिवद्रोही होते. शिवद्रोही आडवे आलेत. हे इतके मस्तवाल झाले की कोणतीही तमा बाळगली नाही आणि त्यांचे पाठीराखे दिल्लीत बसले आहे.  किल्ल्यावर रस्ता अडवणारे मोदी, शाहांचे दलाल आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केलाय. 


हा पुतळा पडला कसा? केसरकर जे बोलताय ते संतापजनक असून पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ 1 सप्टेंबरला हुतात्मा चौकातून 'सकारला जोडे मारो आंदोलन' करण्यात येणार आहे, अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली. सकाळी 11 वाजता हुतात्मा चौक ते गेट वेवर मोर्चा काढणार असल्याचही ते यावेळी म्हणालेत. 


शरद पवार काय म्हणालेत?


पुतळ्याची जबाबदारी ही पूर्णपणे राज्य सरकारची असल्याच शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले. 'ते नाकारू शकतं नाही. पुतळ्याच्या उद्घाटनासाठी प्रामुख्यानं राज्य सरकारचे प्रतिनिधी तसंच स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील त्या ठिकाणी होते. त्यामुळे जबाबदारी राज्य सरकारचीच आहे,' असे त्यांनी ठामपणे सांगितलं. 


त्यांनी पुढे शिवाजी महाराज यांचं उदाहरण देत म्हणाले, 'एका महिलेला त्रास दिला म्हणून त्यावेळी शिवाजी महाराज यांनी त्याचे हात कलम करण्याचे आदेश दिले होते. आम्ही कुठल्याही प्रकारचे राजकरण करतं नाही पण कुणी सांगत आहे की वाऱ्याचा वेग जास्त होता त्यामुळें पुतळा पडला. मग ज्या ठिकाणी पंतप्रधान गेले तिथं किती मोठया प्रमाणात भ्रष्टाचार खोलवर पोहोचलाय हे पाहिला मिळालंय. या सरकारबद्दल जनतेच्या मनात चीड निर्माण झाली आहे.'


तर महायुती सरकार कमीशनखोर आहे. जेव्हा पुतळ्याचा अनावरण केलं जात होतं त्यावेळी प्रोसिजर फॉलो केली गेली नाही. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे उद्घाटन करण्यात आलं. मुख्यमंत्री म्हणताय मी यापेक्षा मोठा पुतळा करू, अरे पण तुम्ही जे पाप केलं त्याचा काय? महाराष्ट्रमध्ये महिला सुरक्षित नाही. रश्मी शुक्ला राजकारण करत आहे . Rss चा अजेंडा चालवत आहे, अशी सडेतोड टीका नाना पटोले यांनी केली.